
    नसावे   नाव,कोणते ते गाव,
      ना तुला ठाव,ना मला ठाव.
      पण अश्याच, नाव नसलेल्या गावी,
      मन   का हुन्दडत राही?
          दोनच मन,त्यात दोघेच जन,
      मग कशाला त्यात आणखी कोणी हव?
      अस नात आपल हव,
      अस नात आपल हव....
             जरी दोन काया,पण एकाच माया,
      दोघानशिवाय नको तीसर कोणी   पहाया,
      एकच रस्ता आणि  तेवडेच अंतर,
      एकत्र चालताना नकोच संपाया   नंतर,
      नको अडथळे ,आणि जर ठेचालाळच   तर,
      एकाच्या जखामेची दुसऱ्या यावी   कळ,
      अस नात आपल हव,
      अस नात आपल हव.....
             दोघांच्या डोळ्यानी एकच जग   पहाव सुंदर,
      डोक्यावरही दोघांच्या एकच   अंबर,
      एकाच दुःख दुसऱ्याच्या   डोळ्यातील दंव,
      मनातील एकाचे दुसऱ्याला न   सांगता समजाव,
      पापण्यांच्या सावलीत एक-मेकास   जपाव,
      कोणी एकास शोधत आले,तर   दुसऱ्याच्या डोळ्यात सापडाव,
      अस नात आपल हव,
      अस नात आपल हव....
             मनात एकमेकांच्या कळीगत उमलाव,
      मग नजरेत गुलमोहरागत फुलाव,
        प्रेमाचा गंध  हवेत पारिजाताकागत पसराव,
      मिठीत एकमेकाच्या लाजाळूगत   लपाव,
      आणि एकदा एकमेकात हरवल्यावर,
      कोणालाच न सापडाव,
      अस नात आपल हव,
      अस नात आपल हव.....