Monday, November 30, 2009

.कोण तुम्ही ?


आज आरश्या समोर उभा राहिल्यावर समजले
मलाही ओळखते कोणी...

बराच वेळ एकटे बोलल्यावर,शांततेने उत्तर दिले,
वाटले माझे ही एकत आहे कोणी...

बरेच अंतर चालल्यावर सोबत सावली दिसली,
चला आज सोबतिलाही आले कोणी....

तसे एकटे राहनेही वाईट नसते हो,
पण एकाकीपणातही उगाचच आठवत असत कोणी....

हे कोणीतरी...तसे आपल्यातच रहाते,
पण तरी ओळख विसरलेली असते जूनी...

मग आपण उगाचच परत आपली ओळख पटवन्याचा प्रयत्न करतो,
पण मग,
हे कोणीतरी आपल्याला विचारतो.....कोण तुम्ही ?



Friday, November 20, 2009

अस नात आपल हव...




नसावे नाव,कोणते ते गाव,
ना तुला ठाव,ना मला ठाव.
पण अश्याच, नाव नसलेल्या गावी,
मन का हुन्दडत राही?
दोनच मन,त्यात दोघेच जन,
मग कशाला त्यात आणखी कोणी हव?
अस नात आपल हव,
अस नात आपल हव....

जरी दोन काया,पण एकाच माया,
दोघानशिवाय नको तीसर कोणी पहाया,
एकच रस्ता आणि तेवडेच अंतर,
एकत्र चालताना नकोच संपाया नंतर,
नको अडथळे ,आणि जर ठेचालाळच तर,
एकाच्या जखामेची दुसऱ्या यावी कळ,
अस नात आपल हव,
अस नात आपल हव.....

दोघांच्या डोळ्यानी एकच जग पहाव सुंदर,
डोक्यावरही दोघांच्या एकच अंबर,
एकाच दुःख दुसऱ्याच्या डोळ्यातील दंव,
मनातील एकाचे दुसऱ्याला न सांगता समजाव,
पापण्यांच्या सावलीत एक-मेकास जपाव,
कोणी एकास शोधत आले,तर दुसऱ्याच्या डोळ्यात सापडाव,
अस नात आपल हव,
अस नात आपल हव....

मनात एकमेकांच्या कळीगत उमलाव,
मग नजरेत गुलमोहरागत फुलाव,
प्रेमाचा गंध हवेत पारिजाताकागत पसराव,
मिठीत एकमेकाच्या लाजाळूगत लपाव,
आणि एकदा एकमेकात हरवल्यावर,
कोणालाच न सापडाव,
अस नात आपल हव,
अस नात आपल हव.....