Thursday, October 29, 2009

सावळ्या रे....


सावळ्या रे....
दोन डोळ्याचे एक स्वप्न ,
मनी एक खंत,
तिला असेच मनी जपन,
जप-आणि मनी तिला,
लपवनारे,
सावळ्या रे....
तुझ्या डोळ्यात जे आहे,
भाव मज ठाव आहे,
नाव नकोच त्यासी,
तरी तुझेच भासी,
जरी भ्रमित सारे,
गीत हेच गा रे,
सावळ्या रे....
संकोचच्या पापण्यानी ,
अडवून धरले जे,
अश्रु आहेत माझे,
असून डोळी जलधारा,
जळ-जळ का रे...
सावळ्या रे....
प्रकाशत आशेचे कण-कण,
अंधारल्या जरिही आशा,
नको ह्या दिशाही,
कोणास उरल्यारे,
सावळ्या रे....
ही ओढ़ आहे कैसी,
खेळच वाटे सारा,
हूर-हूर बोचे मनी,
नयन संभाळे पारा,
पलायन हे कैसे,
स्वतःच सापडलाशि ,
दूर जात आहे ती,
धावनारे...
सावळ्या रे....सावळ्या रे....सावळ्या रे....

Friday, October 23, 2009

आपुले नाते

इतुके नाजुक आपुले नाते,
मनी एक-मेकाच्या रहाते,
माझे हसने तुझ्या ओठी,
तुझे हसने माझ्या ओठी दिसते....

अवचित सामोरी येउनी,
मागल्या जन्माचे नाते ओळखुनी,
अनोळखी सारखे वागत होतो,
ओळख आता पटुनी,
का पहावे आपण मागे वळूनी....

तुझ्या तसविरीकड़े मी पाहिले होते,
माझे हरवलेले डोळे पाहुणी,
तुझेहीतर डोळे लाजले होते,
आणि मग त्या रात्री आपले डोळे अकंठ जागले होते....

आपल्यात होते आपल्या फरका एवढेच अंतर,
मनी विचार आपल्या येई एक-मेका नंतर,
प्रश्न देखिल दोघांचे असे शहाणे की,
उत्तर असे एक-मेका कड़े नेमके....

नाते नाही या जन्माचे,
ओळख वाटे कोणा दुसऱ्या युगाचे,
शब्द आपले आपणच जपले,
भावनाही आपणच स्वतहाला आवरे...

नाव नाही, नको वाटे या नात्याला,
बघून हसने एक-मेका येता-जात्याला,
समोर नसूनही डोळ्यात बघून बोलने,
समोर येता नजर हये सोबत खाली पड़ते,





Tuesday, October 13, 2009

अंधार-उजेड

कधी-कधी वाटते,
अंधार-उजेड असे काही नसते,
ज्यांचे नैत्र बंद असते,
तया नशिबी सदा तमा असते....
मनी तयांच्या सदा ओलसर अंधार जमा असते...
पण हा अंधार तरी काय वाईट असतोहो ?
त्या लक्ख टोचना-या उजेडा पेक्षा,
तरी सर्वाना असते उजेडाचिच का अपेक्षा ?

कधी-कधी अंधारात वाटते,
क्षितिज हाती आले आपल्या,
तो दोष नसतो दिशांचा,
अंतरच कळले नसतात आपल्याला,
मग त्यात अंधाराचा काय दोष,
हातात न आलेले ते आभाळ मात्र ,
हात ओले करून जातात,
आणि तेव्हा कळते आभाळ समजुन,
आपले हात आपल्याच डोळ्यांवर फिरले,
तरी मग त्यात अंधाराचा काय दोष,
अंधारातही डोळ्यांसमोर तिचाच चेहरा असतो तेव्हा,


आणि म्हणुनच वाटते,
अंधार-उजेड असे काही नसते,
असतो तो फ़क्त कोणाचा तरी लक्ख प्रकाशमान चेहरा...

मी...

मी नसेन माझी सावली असेल,
पण माझ्या सारखीच वागेल....

तुला थाम्ब बोलेल,
तुझा थोडा सहवास मागेल,
त्याला तू असेच नको बोलू नकोस,
त्याला तू असे दूर जा बोलू नकोस,
जशी मला हळूवार हसत टाळायचिस,
तसेच त्यालाही हळूवार दूर लोट,
पाउस रुण-झुण येइल तेव्हा मात्र,
थोडी अधीर होइल माझी सावली,
मी लिहिलेल्या कविता उगी तुझ्यापुढे गाइल,
तुझ्या ओल्या पावलाना पाहून उगी वेडावून जाईल,
तेव्हा मात्र तू दूर लोट,दूर ढकल,अगदी दूर हकल,
कारण,कारण,
पाउस गेल्यावर तुला पाउस आणि अश्रु वेग-वेगळे दिसतील,
आणि तेव्हा तिथे माझी सावली नसेल,
तिथे असेल तो माझ्या सारखाच दिसणारा,
माझ्या सारखाच हसणारा,
माझ्या सारखाच तुला पाहणारा,
मी... .....


Sunday, October 11, 2009

छंद


आताशा नवा छंद जोपासलाय विसरन्याचे,
सर्व विसरलोय मी आपल्यातले,
प्रत्येक कविता लिहिले होते मी जे तुझ्यावर,
प्रत्येक शब्द मी जे तुला बोललेलो,
वा प्रत्येक शब्द जे तू मला बोललीस,
किव्हा नाही बोललीस,
अशी ती वाट जिला स्वतहाचे अस्तित्व नव्हते,
होते ते फ़क्त त्यावर आपल्या पाउलखुणा,
स्पर्ष जे मी तुला माझ्या डोळ्यानी केलेले,
तुझी ती चोरटी नजर जी मला घोर लावत असे,
तुझे ते हसने जे जगने शिकवत असे,आणि......
ते सर्व जे मनी साचले होते,
जे डोळ्यात गोठले होते,
तेहि तर विसरलो आता मी.....

फ़क्त विसरायचे राहीले एकच,
मला काय-काय विसरायचे होते ते....
आणि आपण विनलेल्या आठवणी....