Wednesday, July 29, 2009

विरह

विरह ,
विरह म्हणजे दोन मनामधलि ताटातुट,
बराच वेळ एक पदरी असलेल्या,
रस्त्याची अचानक एका नकोश्या वळनावर,
झालेली फाटाफुट....
विरह म्हणजे भल्या पहाटे बाबानी घेतलेला झोपलेल्या बाळाचा मुका,
दिवसभर बाबांची वाट पाहून,थकून-डोळे पानावुन
झाल्यावर झोपी जाण्यासाठी,
कायम बांधलेला आईच्या कुशीचा झोका।

विरह म्हणजे दाट-राट न विन्चरलेले केस,
आईने नाजुक हाताने,
तेलाने थप-थापुन डोक्यावर,
केलेली प्रेमळ मालिश।

विरह म्हणजे जीने उतरताना कधी बंद तर कधी सताड उघडा दिसणारा दरवाजा,
बेल वाजवून तूच माझी राणी,
असे मनातल्या मनात घुसमटत कल्पनारा,
स्वप्नातील राणीचा खरा-खुरा बिनधास्त राजा।

विरह म्हणजे तिने कधीतरी मारलेली हाक,
असेच एकटे चालत असताना,
परत कानावर आलेली आणि म्हणुन दचकून,
आवाजाच्या दिशेने डोकावून पहाताना असलेली मनातील धाक।

विरह म्हणजे हल्ली रिकामा झालेला कोलेजचा कोलेजचा कट्टा
मऊ खुर्चीत मधेच रुतनारा,
ऐ।सी. ची गार हवा कानावरुन जाताना,
मित्रानी मारलेला न विसरानारा गरम हवेचा सुट्टा।

विरह म्हणजे गैर-समज,
अनेक चुक-भूल माफ़ केल्यावर,
तू चुक मीच बरोबर अशी,
चुकीची समज।

विरह म्हणजे या कवितेच कधीही न होणारा अंत,
आयुष्य पूर्ण सरल्या नंतर,
काहीतरी जगायाचे राहिले ,
असे उगाचच वाटणारी मनातील खंत.

Saturday, July 25, 2009

रस्त्यावरील प्रत्येक वळनावर वाटते,
पोहोचलों त्या ठिकाणी,
वळन संपल्यावर कळते,
सुरु केले होते होते मी ह्याच ठिकाणी.

मग मन धास्तावाते मागे पाहायालाही,
रास्ता असतो रिकामा,
जेवढा पुढचा असतो,
तेवढाच असतो मागलाही.

मग मन ठरवते,
पुढेच आता चालायचे,
तूझ्याशी भेट होत नाही तो पर्यंत,
असेच मारत जगायाचे.

कोण जाने कोणा एका वळनावर,
तू मला भेटशील,
एवढीच आशा असेल तेव्हा,
माझ्या नजरेला तू नजर देशील...
प्रेमात नेहमी असेच होत,
कधी तिला वाटते,त्याने काहीतरी बोलावे,
कधी त्याला वाटते तिने काहीतरी बोलावे,
आणि मग या अबोलात,दोघे बरेच काही बोलतात.
प्रेमात नेहमी असेच होत,
कधी-कधी प्रेमी एक-मेका पासून दुरावातात,
मग त्याला वाटते,तिने माझ्या जवळ यावे,
तर तिलाही वाटते त्याने मला जवळ करावे,
आणि मग या दुराव्यात,दोघाताले सर्व अंतर संपतात.
प्रेमात नेहमी असेच होत,प्रेमी एक-मेकांशी खुप भांडतात,
मग तिला वाटते त्याने माझे रुसवे काढावे,
तर त्याला वाटते तिने मला समजुन घ्यावे,
आणि तरीही या गैर-समजुतित,
दोघांची मने एक-मेकाना समजतात.
प्रेमात नेहमी असेच होत,
खर प्रेम कळतच नाही,
कळले तरी रुसव्या-फुगाव्यात ते व्यक्त करायचे राहून जाते,
मग कधी-कधी उशीर होतो,
आणि मग ....
आणि मग आपण एक-मेकाना आठवत असतो....

Tuesday, July 21, 2009

जेव्हा तू माझ्या समोर येतेस,
मला तुला माझ्या डोळ्यात साठवायचे असते..
पण पाणावलेले माझे डोळे,
तुला पुसट-अंधुकपणे सामावून घेतात,
अशावेळी मला माझे डोळेच मला नकोसे वाटतात,
कारण आशा अवेळी त्यात अश्रु दाटतात.....

आयुष्य


या आयुष्यावर बोलू काही,
तस बोलन्या सारखे काहीच नाही.
सगळे आपले-परके आहेतच आयुष्यात,
पण,मन ओळखन्याचि तसदी कोणी घेतच नाही.
या आयुष्यावर बोलू काही,
तस बोलन्या सारखे काहीच नाही.


आयुष्य म्हणजे सजलेली सुन्दर महफ़िल,
हयात रमनारयाची काही कमीच नाही,
दिवस मावळतो तशी ह्याची रौनक वाढते,
पण महफ़िल संपल्यावर कोणी उरतच नाही.
या आयुष्यावर बोलू काही,
तस बोलन्या सारखे काहीच नाही.


कधी नकोशी वाटणारी लोकांची गर्दी असते,
तर कधी बोचनारा हवासा एकांत राही,
मग कधीतरी वाटते,
कोणीतरी असावे जो मनात आपल्या झाकून पाहिल,
पण मग कळते जवळ कोणी नाही.
या आयुष्यावर बोलू काही,
तस बोलन्या सारखे काहीच नाही.


आयुष्य हे स्वप्न आहे,
स्वप्नात नेहमी कोणीतरी राही.
पण मनाला हे कळतचनाही,स्वप्न कधी पूर्ण होताच नाही.
आणि ह्या अर्ध्या स्वप्नान बरोबर,
मन आपले एकटेच राही.
या आयुष्यावर बोलू काही,
तस बोलन्या सारखे काहीच नाही.....

Friday, July 17, 2009

बंद खिड़की






तुझ्या स्वयंपाक घराची ती बंद खिड़की

आणि त्या खिड़की मागे,

संथ हालचाल करणारी तुझी सावली.

हे दृश्य मी रोज़च पहातो.

आणि घरी परतल्यावर,

एकांतात तुझ्याच विचारात नहातो.

पुरता हरवल्यावर मग मी तुला हाक मारतो.

"राहुंदे तो स्वयंपाक, ये इथे माझ्या जवळ बस."

आतून उत्तर न आल्यावर मग मी मलाच टपली मारतो.


मग परत रात्र तुझ्या आठवनित जागल्यावर,

पहाटे डोळे चोळत उठतो.

आणि दिवसभर असा वागतो जसा कोणी वागतो स्वतहालाच विसराल्यावर.



मग पुन्हा संध्याकाळ येते,

पाय आपणच पुन्हा त्या रस्त्याकडे वळतात,

काही अंतर चालल्यावर मान पुन्हा डावीकडे वळते,

कारण मला परत दिसते....



तुझ्या स्वयंपाक घराची ती बंद खिड़की

आणि त्या खिड़की मागे,

संथ हालचाल करणारी तुझी सावली.

Thursday, July 9, 2009

स्वप्न....




मी दाराची बेल वाजवली

पण मी आल्याची चाहुल लागलेली तू

आधीच दारामागे लपलेली.


मग मी प्रेमाने तुला हाक मारली

कसे तरी हसने गालात दाबुन तू

दबक्या पाउलानी दारा बाहेर पडली.


मग तुझे ते उगीचच विचारने

"आज उशीर का झाला ?"

मग ,मी दहा मिनिटे आधी आलोय ,हे घड्याळ्य़ानेच दाखवने.


मग तुझे ते गालातच

हसने दार घट्ट पकडून ,

पायाच्या नखाने लाजत जमिनीला पोखरने.


मग मी केसांवरचे पानी तुझ्यावर उड़वने

मग तुझे ते गालावरचे थेम्ब

टिपत"भिजलास का?" असे रागे भरने.


नेहमी प्रमाणे मी कान पकडून सॉरी बोलणे

दारात उभे आहोत आपण ,

हे लक्षात आल्यावर,"बरा आहेस ना ?"तुझे असे बोलणे.



मग सगळे विसरून ,

तुला कडेवर उचलून ,मी तुला घरात आनणे

आणि तुही ,एखाद्या लहान बाळा प्रमाणे माज्यात स्वतहाला लपवणे.


तोच,कोणी तरी येण्याची चाहुल लागली

ह्या सर्व विचारानेच ,माझी तहान भागली

काय कळले नाही का?अहो मी हे सर्व स्वप्न पाहिले.


मी दाराबाहेराची बेल

वाजवली पण ती तिच्या घराची होती

सताड दार ठेउन ती आतल्या खोलीत गेलेली.


बाहेर आल्यावर , मला असे हरवलेला बघून ,

तिनेच विचारले "काय बरा आहेस ना?"

काय सांगणार तिला मी कोणते स्वप्न पाहिले .


वस्तुंची अदला-बदल केल्यावर

तिचे मन तिच्याकडेच ,पण माझे मन तिने हिरावून घेणे

मी जातोय हे कळल्यावर मात्र ती स्मित हास्य हसली .


त्या तिच्या हसण्या कड़े पाहून मात्र ,

मी समाधानी होउन,

परत फिरलो माझ्या घराच्या वाटेवर.....

Monday, July 6, 2009

थोड़े मनातले...

सागराच्या वादळात अडकलेल्या ,
जहाजालाही काठा पासून दूर जावेसे वाटते,
किनारा खडकाळ आहे हे जेव्हा त्याला कळते.
मी मात्र त्या लाटां प्रमाणे आहे,
सतत तुटले तरी लाटाना किनारयाचिच ओढ़ आहे ...
----------------------------------------------------------------------------------
मी तुला पाहिले मला सोडून जाताना ,
लोकानी मात्र पाहिले माझे अश्रु वाहताना .
लाख प्रयत्न केले पण , अश्रु काही लपले नाही ,
एवढे करूनही तुझे जाने टळले नाही .
---------------------------------------------------------------------------------
माझे घर नदी किनारी आहे ,
अशी लोकांची ओरडा-ओरड होती .
मन मात्र माझे सदैव कोरडे राहिले ,
मला नेहमीच याचीच खंत होती .
---------------------------------------------------------------------------------
कधी-कधी दुःखाची खुप गर्दी होते .
त्या दुःखात मग रडून-रडून सर्दी होते.
तर मग आपण असे का करत नाही ?
त्या आसवांच्या वर्षावात भिजुन घ्यायचे खूप...
मात्र नंतर न विसरता घ्यायची मैत्रीची ऊब.
--------------------------------------------------------------------------------

Sunday, July 5, 2009

हे तुला कधीच नाही कळनार....


तुझे दुखणे,
माझ्या मनात खुपने ,
कधीच कोणाला नाही दिसणार,
हे तुला कधीच नाही कळनार....

तुझे उपाशी झोपणे,
माझ्या आतड्याना पीळ पड़ने,
कधीच मी कोणाला नाही दाखवणार,
हे तुला कधीच नाही कळनार....

तुझे रात्रीचे जागने,
माझ्या डोळ्यात काहीतरी सलने,
कधीच कोणाला नाही समजणार,
हे तुला कधीच नाही कळनार....

तुझे रडने,माझे डोळे सूजने,
कधीच कोणाला नाही जाणवनार,
हे तुला कधीच नाही कळनार....

तुला झालेल्या प्रत्येक त्रासाने ,
मला काय फरक पडणार ,
हे तुला कधीच नाही कळनार....

Thursday, July 2, 2009

रोज़

.....रोज़.....

रोज़ तुला विसरतो , रोज़ तुला आठवतो ,


रोज़ काहीतरी ठरवतो , रोज़ काहीतरी मिटवतो ,


रोज़ स्वतःला सोपवतो ,रोज़ स्वतःला परत मागतो ,


रोज़ तुझी अपेक्षा करतो , रोज़ स्वतःची उपेक्षा करतो ,


रोज़ रात्री जागवतो , रोज़ पहाट लाम्बवतो ,


रोज़ स्वतःला थाम्बवतो , रोज़ स्वतःला सोडवतो ,


रोज़ शहानपण दाखवतो , रोज़ वेड्या सारखा वागतो ,


रोज़ बावरतो , रोज़ सावरतो ,


रोज़ तुझ्यातच हरवतो , रोज़ तुझ्यातच सापडतो ,



रोज़ स्वतःला संपवतो ,रोज़ सतःला जगवतो.....

Wednesday, July 1, 2009

कथा...


ही कविता नाही ,कथा आहे ,
एका फाटक्या नशिबाची .
हयात लिहिलेले शब्द नाहित ,
व्यथा आहे एका फकिराची .

प्रत्येक शब्दात स्वतःचे मन उतरवले ,
यमक जुळत नसतानाही , तुटके मन जुळवले .
शब्द , लिहायचा त्याना परत मिटवायचा ,
जमले असे वाटताच , डोळ्यातले अश्रु विसरायचा .

पण ओळी त्याच्या पूर्णत्वाला कधी पोहचल्याच नाहित जिच्यासाठी लिहिले ,
तिने वाचले , पण मनापर्यंत तिच्या कधी पोहचालेच नाही .

तो तिची मनातली छबी शब्दात उतरवायचा ,
तर कधी तिला देव मानून , कवितेत पूजायचा .

त्या देवीला ही त्याची पूजा कधी कळलिच नाही ,
या शापित भक्तावर ती देवी कधी प्रसन्न झालीच नाही .

लोकाना मात्र त्याच्या कवितांचे नवल वाटायचे ,
काहीजण त्यांवर खुष होउन ,तर काही मिश्किल पने हसायचे .

त्यांवर कधीच लक्ष दिले नाही .
कारण त्याला तिच्या पलिकडे काही सुचलेच नाही .

पण तीही त्याच्यावर हसली ,त्याचे मन तुटले ,
त्याने देवाला विचारले ," एवढी परीक्षा कसली ?"

तरी तो ते तुटके मन परत जोडायचा ,
म्हणे , ती रहाते या मनात ,म्हणुन परत शब्दाना तोडून - मोडायचा .

पण आता त्याचाही धीर तुटत होता ,
डोळ्यांवर लावलेला बाँध सतत तुटत होता .

कदाचित ही तरी त्याची ती शेवटची शापित कविता असेल ,
पण तो तिची वाट पहाणे सोडणार नाही ,
हा त्या शापित कवीचा शेवट नसेल .