आता मला तुझी कमी भासत नाही ,
ती असताना मला तुझ्या असन्याचिही गरज लागत नाही.
मला जेव्हा तुझ्यावर प्रेम व्यक्त करायचे
असते तेव्हा तू माझ्या जवळ नसतेस ,
ती मात्र मला कधीच सोडून जात नाही.
तुझा विचार करत असतानाही ती मला सतत पहाते,
माझ्यावरची तिची नजर क्षणभरही हटत नाही
आणि म्हनुनच मला आता असे वाटते
ती असताना मला तुझ्या ,
असन्याचिही गरज लागत नाही .
रात्रि सर्वे झोपी जातात ,
मी मात्र तुझ्या विचारात जागाच असतो
तीही मग माझी सोबत देते
मी तुझ्यावर केलेल्या कविता एकून त्याना दाद देते
पहाट झालीतरी ती मला सोडून जात नाही ,
आणि म्हनुनच मला आता असे वाटते .
ती असताना मला तुझ्या ,
असन्याचिही गरज लागत नाही .
तुझ्या बद्दल माझ्या मनात बरच असत.
तुला सांगताना मात्र माझ मन धसत.
मग ती हळूच माझ्याकडे बघते .
मनात माझ्या काय आहे ते विचारते.
मग मन मोकळे करताना मीही मागे बघत नाही .
आणि म्हनुनच मला आता असे वाटते ,
ती असताना मला तुझ्या ,
असन्याचिही गरज लागत नाही.
तू खळ-खळत्या नदी प्रमाने वाहते.
ती संथ पावसा प्रमाने बरसते.
तुझ्यात मला बुडन्याची भीती वाटते.
ती मात्र शांतपणे मला भिजवते.
तिच्यात भिजताना मग मी कुठेच सुखा रहात नाही .
आणि म्हनुनच मला आता असे वाटते ,
ती असताना मला तुझ्या ,
असन्याचिही गरज लागत नाही.
ती असताना मला तुझ्या ,
असन्याचिही गरज लागत नाही.
तीच दिसनेही आता तुझ्या सारखे आल्हाददायी असते .
तिचे हसनेही मला तुझ्या सारखेच रुचते.
तू माझ्या जवळ नसते .
ती मात्र कधी दूर होत नसते .
ती असताना मग मला माझीही गरज लागत नाही .
आणि म्हनुनच मला आता असे वाटते ,
ती असताना मला तुझ्या ,
असन्याचिही गरज लागत नाही.
ती अशी ती तशी सांगुन मी तुला जळवत नाही .
तस होनारही नाही कारण तुला फरक पडनारही नाही.
कधी कधी ती मात्र तुझी बाजू मांडून माझ्याशी भांडते .
म्हणते ,विसर तिला मी तुझ्या सोबत संसार मांडते .
मग मात्र मला तिचेही मन तोडवत नाही .
आणि म्हनुनच मला आता असे वाटते ,
ती असताना मला तुझ्या ,
असन्याचिही गरज लागत नाही.
ती असताना मला तुझ्या ,
असन्याचिही गरज लागत नाही.
आता मीही ठरवले तिच्या सोबत सुखी रहायचे .
आपले जून सगळ विसरायचे .
"ती"...'ती' म्हणजे कोण ते ठाउक आहे ?
ती म्हणजे "तुझी आठवण".
हे मात्र सांगितल्या शिवाय रहावत नाही .
आणि म्हनुनच मला आता असे वाटते ,
ती असताना मला तुझ्या ,
असन्याचिही गरज लागत नाही .