Friday, June 26, 2009

विसरणार?




विसरणार मी तुला कधीतरी विसरणार,
विसरता-विसरता तरीही कधी-कधी तू मला आठवणार .


असेच कधीतरी ,एक रात्रि ,
उशिरा एकटेच फिरत असताना ,
तिथेच, आपण जिथे भेटलो होतो,
' पुरे आता घरी ये !'
असे कोणीतरी बोलणार,
असेच कधीतरी तुला विसरताना ,तू मला आठवणार।



असेच कधीतरी,दिवे लागनेची वेळी ,
एकटा,अंधार खोलीत बसलो असताना ,
' एवढा विचार करू नकोस !'
असे कोणीतरी बोलणार ,
असेच कधीतरी तुला विसरताना ,तू मला आठवणार।



असेच कधीतरी दिवस ढवळया
खूळया सारखा वागत असताना
असाच मी तुला वेडा वाटायचो
'तू वेडा आहेस का ?'
असा प्रश्न कोणीतरी करणार ,
असेच कधीतरी तुला विसरताना ,तू मला आठवणार।



असेच कधीतरी
मध्यरात्री डोळे उघडे ठेउन झोपत असताना
असाच मी चांदन्याशी तुझ्याबद्दल बोलायचो ,
' तू जरा जास्तच करतोस '!
असे एखादी चांदनी बोलणार
असेच कधीतरी तुला विसरताना ,तू मला आठवणार।



असेच कधीतरी कोणत्या वेळी ठाउक नाही ,
कोणत्यातरी वळनावर ,
तू मला दिसणार ,
तू मला चोरून ,तर मी तुला मन भरून बघणार ,
तेव्हा परत एकदा मी तुला माझ्या आठवनित साठवणार ,
तूच मला आता सांग मी तुला असे कसे विसरणार ?


No comments:

Post a Comment