Sunday, September 13, 2009

तू ...

मीण -मिणत्या उजेडात,
चंद्र गुण-गुणत होता,
भर दिवसा जणू तो तुला प्रकाश उसने मागत होता....

हसने तुझे बघून,
चांदणही लाजले होते,
एवढे टक लावून त्यानाही कोणी बघितले नव्हते...

हवाही उगाचच,
तुला बिलगून वाहत होती,
तुझ्या केसात हरवून,जणू तिथेच बस्थान मांडू पहात होती...

चिम्ब भिजुन,
पाउसही ओला झालेला,
तुझ्या गंधात सगळे विसरून जणू तो नहालेला...

No comments:

Post a Comment