Thursday, December 31, 2009

तूज पासून एक वाट हरवली,
तूज वाचून एक रात्र मावळली,
तूज शिवाय एक श्वास विरघळला,
तूज राहून एक अश्रु गोठला,
तूज परी एक अस्तित्व हरपले,
तूच मिळवले,तूच संपविले....
तुजेच होते,तूच दुरावलेस....

तरीही....

मी असेन किंवा नसेनही,
तरीही,मज पाशी अनंत असशील तू....

डोळ्यात माझ्या लिहिलेले जे तुजसाठी न तुला कळले,
तरीही,माझ्या डोळ्यात निरंतर असशील सवे तू.....

कधी अनोळखी होतो आपण,कधी अनोळखी होऊ,
तरीही,माझी ओळख बनून असशील मजपाशी तू....

बदलून स्वतःला जर उरलोच स्वतःकडे,
तरीही,मला ओळखशील का सखे तू...?

काळास कोण बांधू शकतो?
तरीही काळा पडयाल माझ्यात उरशील तू....

Thursday, December 17, 2009

बहाणे...

काहीसे आशय असलेले,काहीसे निराशय,
जगने म्हणजे,जिवंत रहाण्याचे पोकळ बहाणे...

मावळतिचा सूर्य, हरवलेली वाट,आणि सोबत जंगले घनदाट,
तरीही पुसट होत चाललेल्या वाटेवर,
असेच चालत रहाने,
जगने म्हणजे,जिवंत रहाण्याचे पोकळ बहाणे...

भर वादळी सागरात,नौकेत सागर तरंगत असताना,
सुटत जाणारया हाताला घट्ट पकडले,
आणि हां स्पर्श अनोळखी वाटला म्हणून ...हाताचा कोष सुटने,
जगने म्हणजे,जिवंत रहाण्याचे पोकळ बहाणे...

स्वताच्याच घराचा पत्ता आपण,परक्याना विचारतो,
शहरभराच्या वाटा आपण वेड्यागत भटकतो,
आणि...तरी स्वतहाला म्हणवतो स्मरण गमावालेलो... शहाणे,
जगने म्हणजे,जिवंत रहाण्याचे पोकळ बहाणे...

Saturday, December 12, 2009

कोंडवाडा….

कोंडवाडा….



निरभ्र अवकाशा खाली,
भिंती नसलेला एक कोंडवाडा,
खुल्या मनाची,
बेधड़क होणारी घुसमट,

काय झाले?
शब्दांची विसंगति वाटते ना?
पण हयात शब्दांचा,
लेखानिचा,वा माझाही,
काहीच दोष नाही...
खरतर आता माझा कोणावरच रोष नाही,
अगदी माझ्या स्वतः वरही...


मी निळ्या अवकाशा खाली उभा राहिलो,
माझे दोन्ही बाहे हवेत चहुकडे पसरवून,
हवेला माझ्यात सामावले देखिल,
पण,पण शेवटी हवाच ती,
हवेला कोण कवताळू शकतो?
तसा माझाही प्रयत्न फसला,
अहो प्रयत्न कसला,हां तर,
मी स्वतहाला दिलेला चकवा होता,
कधी पूर्णच होऊ नये म्हणून,
कधीच न संपनाऱ्या रात्री पडलेले,
स्वप्न होते ते...

शेवटी कसे असते स्वप्न पूर्ण होण्या साठी,
पहाट व्हावी लागते,
सूर्य उगवावा लागतो,
पक्षी सैर-वैर अवकाशात उडावे लागतात...

पण अताशा अवकाशाचिही घुसमट होते हो !
अगदी माझ्या-तुमच्या मनासारखी,
अगदी माझ्या शब्दांसारखी...

आणि म्हणुनच हां सर्व खेळ,
विसंगत वाटला तरी...
शब्दांचा खेळ खेळावा लागतो...

ह्या निरभ्र अवकाशाखाली,
भिंती नसलेल्या कोंडवाड्यात हसत जगावेच लागते,
खुल्या मनाची बेधड़क होणारी घुसमट,
सहन करावीच लागते...

न तुला कळले,न मला उमगले...

ऋणानुबंध हे आपल्यातले,
न तुला कळले,न मला उमगले...

डोळ्यात तुझ्या माझे हरवने,
आणि मग तुझ्या हसण्या-बोलण्यात सापडने,
न तुला कळले,न मला उमगले...

माझ्या शब्दात तुझे मिसळने,
आणि मग उगी स्वतहाला सावराने,
न तुला कळले,न मला उमगले...

माझ्या शब्दात तुझे मिसळने,
आणि मग उगी स्वतहाला सावराने,
न तुला कळले,न मला उमगले...

छंद हा आहेच निराळा,
एक-मेकांशिवाय न कोना करमले,
पण हे तर,
न तुला कळले,न मला उमगले...

ही वेळ ...

ही वेळ



ही वेळ थोड़ी वेडी आहे,
उगी काढलेली खोडी आहे,
का बरे आठवले पुन्हा तेच,
छळले का आधी तिने थोड़े आहे....

माझी तू कोण आहेस?

माझी तू कोण आहेस?



कोण आहे मी तुझा,माझी तू कोण आहेस?
कधी इतुकी जवळ,कधी अपरम्पार दूर का आहेस?

कधी दुराव्याचे दुःख,कधी आपलेसे दुखणे,
जवळ असून ही माझे नसणे,
आणि एवढ्या दुरुनही तू माझ्यात आहेस,

अवेळी डोळ्यात येणारे पाणी,
तुझी येणारी क्षण-क्षण आठवण,
आणि तुला आठवताना येणारे,
उगी माझ्या ओठावरिल हसने आहेस.

तो मेघ ही तुझ्या सम झर-झर,
बरसतेस अशी कधी तरी मज वर,
थंडित होणारी हवी-हवीशी थर-थर आहेस.

कधी माझ्या कवितेत सुंदर ओळी मधे,
कधी माझ्या डोळ्यात सुंदर स्वप्ना मधे,
अबोल झालेल्या माझ्या तृश्नेसाठी संथ वहाणारी कृष्णा आहेस.

खरच ठाउक नाही मी तुझा कोण?
मज साठी या प्रश्नाला नाही काही मोल,
पण माझ्या साठी तू जणू पृथ्वी गोल आहेस.

सुरुही तुझ्यात होतो,
शेवट ही माझा तुझ्यातच,
तरी एक प्रश्न आहे पडलेला मज...
कोण आहे मी तुझा,माझी तू कोण आहेस?

Thursday, December 10, 2009

तेव्हाही...


काही दिवसानी जेव्हा आपण एका रस्त्यावरून,
समोरा-समोर चालत असू,
आणि प्रत्येक पवालागाणिक आपल्यातली कमी होणारे अंतर,
आपल्या मनातील अंतराची जाणिव करत असतील,
तेव्हाही मी तुला विसरण्याचा फ़क्त प्रयत्न करत असेल...








तेव्हाही तू अशीच असशील ना?
जेव्हा आपल्यातली अंतर निरुत्तर झालेली असतील...


तेव्हाही तू अशीच हसशील ना?
जेव्हा जवळून जाताना आपल्या सावल्या,
एक-मेकात अडखळतिल ...


तेव्हाही तू अशीच रागे भरशील ना?
जेव्हा आपल्यातली अंतर आपली नाते सुचवतील...


तेव्हाही तू अशीच रुसशील ना?
जेव्हा आपली रुसवे-फुगवे एक-मेकान्वर नसतील...


तेव्हाही तू मला अशीच आठवशील ना?
जेव्हा तुला,मला विसरान्याशिवाय काहीच आठवणार नाही....