माझी तू कोण आहेस?
कोण आहे मी तुझा,माझी तू कोण आहेस?
कधी इतुकी जवळ,कधी अपरम्पार दूर का आहेस?
कधी दुराव्याचे दुःख,कधी आपलेसे दुखणे,
जवळ असून ही माझे नसणे,
आणि एवढ्या दुरुनही तू माझ्यात आहेस,
अवेळी डोळ्यात येणारे पाणी,
तुझी येणारी क्षण-क्षण आठवण,
आणि तुला आठवताना येणारे,
उगी माझ्या ओठावरिल हसने आहेस.
तो मेघ ही तुझ्या सम झर-झर,
बरसतेस अशी कधी तरी मज वर,
थंडित होणारी हवी-हवीशी थर-थर आहेस.
कधी माझ्या कवितेत सुंदर ओळी मधे,
कधी माझ्या डोळ्यात सुंदर स्वप्ना मधे,
अबोल झालेल्या माझ्या तृश्नेसाठी संथ वहाणारी कृष्णा आहेस.
खरच ठाउक नाही मी तुझा कोण?
मज साठी या प्रश्नाला नाही काही मोल,
पण माझ्या साठी तू जणू पृथ्वी गोल आहेस.
सुरुही तुझ्यात होतो,
शेवट ही माझा तुझ्यातच,
तरी एक प्रश्न आहे पडलेला मज...
कोण आहे मी तुझा,माझी तू कोण आहेस?
No comments:
Post a Comment