नजर टाकून पाहिली दूरवर ,
पण दिशा रिकाम्या,दूरवर कोणी नाही...
माळरानही झाले आता सैरभैर ,
वारा झोंबत आहे ,लक्ख झाला उजेड,
पण पणतीला विजन्याची जाग नाही.....
आता ना उरले कुंपण,
ना उरले कुंपणाचे अंगण,
घराबाहेर नजर टाकली तर तुळशीला दिवा लावायलाही कोणीच नाही....
सांजही अलीकडे वेड्यागत वागते,
राहून-राहून जुन्या आठवणी मांगते,
पण आत्तातर माझ्याकडे आठवणीही नाही....
वाटा वळण घेतात चुकीच्या,
पण पायांना कोण समजावेल,
जिथे त्याना जायचे आहे तिथे त्यांचे कोणीच नाही....
नजर टाकून पाहिली दूरवर ,
पण दिशा रिकाम्या,दूरवर कोणी नाही...
No comments:
Post a Comment