Saturday, February 6, 2010

आठवणीचे गाव.......

तुझ्या आठवणीच्या गावी मन माझे असेच उगी रमते,
हात सरसावतात पुढे,स्पर्षाया तुला,
अन् मन असेच अवचित फसते....


रस्तेहि वाटे ओळखीची,त्यावरली पाउलखुणाही,
आता चालतो एकाकी,मन तुलाच शोधते,
येतेशी समोरी कधी या वाटेवरीही,
साद देतो तुला मी,
अन् मन असेच अवचित फसते....



सांज होता-होता वाराही जोर धरतो,
आडोशा हाताचा करतो,आठवणीचा दिवा मीण-मीणतो,
दिव्याच्या त्या उजेडात, मग विरहाची रात्र मावळते,
अवकाशी चंद्र येतो,
अन् मन असेच अवचित फसते....

No comments:

Post a Comment