शब्दानाही बंधन आहेत,
कविता तरी मज कैसे सुचावे...
सांग सवे मज...
रुपाला मी तुझिया कैसे वर्णावे.....
बागा सुन्या तुझविन
पाहून तुझ फुलानाही वाटे रुसावे...
गालावर खळी पाहून तुझिया
वाटे तू सदा असेच हसावे....
उसने सौंदर्य त्या चंद्राचे
उपमा त्याची तुजला कैसे द्यावे...
दिवसा निघता तू ,
न राहावूनी सुर्यानेही तुझ लपून पाहावे....
सांग सवे मज...
रुपाला मी तुझिया कैसे वर्णावे.....
No comments:
Post a Comment