Friday, August 7, 2009

"दीप"

आज देवाने आगाळीक साक्षात्कार घडवले,
स्वतःच्या प्रतिमेत त्याने मला तुझे रूप दर्शाविले...

देवास केले मी तेव्हा शत प्रणाम,
जणू त्याने दिले माझ्या सत्य प्रेमाची प्रमाण..

देवाचे रूप वाटत होते तेव्हा नयनरम्य,
कारण पाहत होतो मी तुमच्यातले साम्य...

तेव्हा अचानक देवातून तू नाहीशी होऊ लागली,
माझ्या काळजाचा ठोका चु़कला,
कारण देवाच्या नजरेत मला कसलीतरी काळजी दिसू लागली...

देवाची काळजी मला समजत होती,
देवाला वाटत असावी,माझे मन तुटन्याची भीती...

तेव्हा मी देवाला समजावले,माझी काळजी नको रे बाबा,
नाहीतरी आता राहिला कुठे माझ्या मनावर माझाच ताबा...

मन हे माझे सोपविले जिला मी,तिलाही हे आहे ठाउक,
पाघळेल कधीतरी तिचे मनही तशी तीही आहेचकी भाउक...

मी माझे माझे काम करत राहेनच,तेच तर आहे माझ्या हातात,
तिच्यावर प्रेम करणे,तुझी प्रार्थना करणे यातच आहे माझे कृतार्थ...

देव तेव्हा मला बोलला,तिचे काही माहीत नाही,
मी तुझ्यावर प्रसन्न आहे...

देव तेव्हा मला बोलला,तिचे काही माहीत नाही,
मी तुझ्यावर प्रसन्न आहे...

मी त्याला बोललो ठीक आहे,
पण मला याचीच तर खंत आहे...

देव मला म्हणाला तिचा निर्णय ती घेइल,
माझ्या कडून तुला काय हवे आहे,
मी त्याला बोललो ,
जर का ती माझी झाली तर मला तुझिही गरज नाही,
आणि ती जर माझी होणार नसेल ,
तर तुझ्यात तरी तिचे रूप दिसेल असेल कर....

तेव्हा देवाने तथास्तु बोलले,
आणि प्रत्येक देवा समोर तुला "दीप" बनवून तेवत ठेवले...

No comments:

Post a Comment