Wednesday, July 29, 2009

विरह

विरह ,
विरह म्हणजे दोन मनामधलि ताटातुट,
बराच वेळ एक पदरी असलेल्या,
रस्त्याची अचानक एका नकोश्या वळनावर,
झालेली फाटाफुट....
विरह म्हणजे भल्या पहाटे बाबानी घेतलेला झोपलेल्या बाळाचा मुका,
दिवसभर बाबांची वाट पाहून,थकून-डोळे पानावुन
झाल्यावर झोपी जाण्यासाठी,
कायम बांधलेला आईच्या कुशीचा झोका।

विरह म्हणजे दाट-राट न विन्चरलेले केस,
आईने नाजुक हाताने,
तेलाने थप-थापुन डोक्यावर,
केलेली प्रेमळ मालिश।

विरह म्हणजे जीने उतरताना कधी बंद तर कधी सताड उघडा दिसणारा दरवाजा,
बेल वाजवून तूच माझी राणी,
असे मनातल्या मनात घुसमटत कल्पनारा,
स्वप्नातील राणीचा खरा-खुरा बिनधास्त राजा।

विरह म्हणजे तिने कधीतरी मारलेली हाक,
असेच एकटे चालत असताना,
परत कानावर आलेली आणि म्हणुन दचकून,
आवाजाच्या दिशेने डोकावून पहाताना असलेली मनातील धाक।

विरह म्हणजे हल्ली रिकामा झालेला कोलेजचा कोलेजचा कट्टा
मऊ खुर्चीत मधेच रुतनारा,
ऐ।सी. ची गार हवा कानावरुन जाताना,
मित्रानी मारलेला न विसरानारा गरम हवेचा सुट्टा।

विरह म्हणजे गैर-समज,
अनेक चुक-भूल माफ़ केल्यावर,
तू चुक मीच बरोबर अशी,
चुकीची समज।

विरह म्हणजे या कवितेच कधीही न होणारा अंत,
आयुष्य पूर्ण सरल्या नंतर,
काहीतरी जगायाचे राहिले ,
असे उगाचच वाटणारी मनातील खंत.

No comments:

Post a Comment