त्या तिथे पलिकडे,
काहीतरी परिचित असे घडत आहे,
का कोणास ठाउक,
रोज़ कोणीतरी रडत आहे...
हे हुंदके तर अगदीच परिचयाचे वाटतात,
जणू हे तर माझ्यात आत कोठे तरी रहातात,
कोणाशी तरी बोलत आहे मन,
सवय झाली आहे एकान्याची "पण"......
रात्री चुप-चाप निमूटपणे पडला असतो,
आणि दिवसा हा तर कोणाचाच नसतो,
कदाचित माझे मनच असेल,
मनाचे काय आकसून बसेल,
बघणारयाला मात्र तुटलेले असुनही...
जुड़लेलच दिसेल.....
त्या तिथे पलिकडे हुंदके देणारे ,
मन कदाचित माझच असेल....
माझ्याशीच अनोळखी होउन,
परक्या सारखे वागेल.....
No comments:
Post a Comment