Sunday, August 23, 2009

अताशा...

अताशा मी उरलोच नाहीये,

का कोणास ठाउक श्वास तर चालु आहे,

पण जगने-मरने यातील अंतर उरलेच नाहिये...


मी अताशा स्वतःलाच सापडत नाहिये,

मित्रांच्या गर्दित कोंडले तर आहे,

पण कोण जाने कोणती ओळखिची नजर सापडतच नाहिये...


अताशा डोळे सुखतच नाहिये,

भर पावसात उभा ठाकलो तर आहे,

पण आसव पावसात लपतच नाहिये....


अताशा रात्र संपतच नाहिये,

डोळे तर मी घट्ट बंद केले आहे,

पण मरणापरी सकाळ उगवतच नाहिये...


अताशा काहीच कसे आठवत नाहिये?

तसे मनाची सर्व कवाड बंद केलीत मी,

पण एक तुझीच आठवण आहे,

की जी आत खोलवर मनात विसरायची राहून गेलिये....

No comments:

Post a Comment