Tuesday, October 13, 2009

अंधार-उजेड

कधी-कधी वाटते,
अंधार-उजेड असे काही नसते,
ज्यांचे नैत्र बंद असते,
तया नशिबी सदा तमा असते....
मनी तयांच्या सदा ओलसर अंधार जमा असते...
पण हा अंधार तरी काय वाईट असतोहो ?
त्या लक्ख टोचना-या उजेडा पेक्षा,
तरी सर्वाना असते उजेडाचिच का अपेक्षा ?

कधी-कधी अंधारात वाटते,
क्षितिज हाती आले आपल्या,
तो दोष नसतो दिशांचा,
अंतरच कळले नसतात आपल्याला,
मग त्यात अंधाराचा काय दोष,
हातात न आलेले ते आभाळ मात्र ,
हात ओले करून जातात,
आणि तेव्हा कळते आभाळ समजुन,
आपले हात आपल्याच डोळ्यांवर फिरले,
तरी मग त्यात अंधाराचा काय दोष,
अंधारातही डोळ्यांसमोर तिचाच चेहरा असतो तेव्हा,


आणि म्हणुनच वाटते,
अंधार-उजेड असे काही नसते,
असतो तो फ़क्त कोणाचा तरी लक्ख प्रकाशमान चेहरा...

No comments:

Post a Comment