Tuesday, October 13, 2009

मी...

मी नसेन माझी सावली असेल,
पण माझ्या सारखीच वागेल....

तुला थाम्ब बोलेल,
तुझा थोडा सहवास मागेल,
त्याला तू असेच नको बोलू नकोस,
त्याला तू असे दूर जा बोलू नकोस,
जशी मला हळूवार हसत टाळायचिस,
तसेच त्यालाही हळूवार दूर लोट,
पाउस रुण-झुण येइल तेव्हा मात्र,
थोडी अधीर होइल माझी सावली,
मी लिहिलेल्या कविता उगी तुझ्यापुढे गाइल,
तुझ्या ओल्या पावलाना पाहून उगी वेडावून जाईल,
तेव्हा मात्र तू दूर लोट,दूर ढकल,अगदी दूर हकल,
कारण,कारण,
पाउस गेल्यावर तुला पाउस आणि अश्रु वेग-वेगळे दिसतील,
आणि तेव्हा तिथे माझी सावली नसेल,
तिथे असेल तो माझ्या सारखाच दिसणारा,
माझ्या सारखाच हसणारा,
माझ्या सारखाच तुला पाहणारा,
मी... .....


No comments:

Post a Comment