Sunday, January 31, 2010

माझा देव.....

तुझ्या हसण्याने दिवस उगवतो,
असण्याने तुझ्या जग सुंदर भासतो ,
तुला पाहण्यासाठीच जणू रात्री चंद्र उगवतो,
मी जसे तुझ्यात माझा देव पाहतो.....

आसमंतातली निळाई,
पावसातली हिरवाई,
फुलानीही रंग तुज कडूनच घेतला,
सूर्यही तुज कडूनच उजेड मागतो,
मी जसे तुझ्यात माझा देव पाहतो.....

तुझ पासूनच सुरु होतो,तूच माझा अंत,
मुठीभर हृदयात माझ्या तू सामावली गगना सम अनंत......
क्षणो-क्षणी तुज पाशी मी तुलाच मागतो.....
कारण....
तुझ्यात मी माझा देव पाहतो.......

असेच होते....

आताशा माझ्या सोबत असेच होते,
डोळे उगी अवकाशात रमतात,
तुझा चेहरा पाहून अवकाशात,मग मन वेड्यासम वागते,
मग माझे दोन्ही हात पसरवून,
वाटते गगनाला घ्यावे स्वताहात सामावून,
आणि अवचित अनंत अवकाशही माझ्या आलिंगनात सामावते,
पण....तू मात्र हातून अलगद निसटताना जाणवते...
आताशा माझ्या सोबत असेच होते....

डोळे पाणावतात,मन अस्वस्थ होते,
श्वाश खोलावतो......सैर-भैर होऊन मी,
तुला परत सर्वत्र शोधतो....
आणि तू नाही सापडलीस कि...
मी डोळे बंद करून तुला माझ्या मनात शोधतो,
मनात मात्र तूच-फक्त तूच सापडते.....
मग मी तुला असेच मनात दडवतो,
सोडून नको जाऊ मला असे विणवतो,
माझ्या मनात अनंत असलेली तू....नेहमी माझे ऐकते....
आताशा माझ्या सोबत असेच होते....

Thursday, January 28, 2010

दैव ...

विरहाच्या पावसात भिजल्यावर,
आता पावसाची कसली भीती,
तुझ्या आठवणीचे प्याले मी एव्हढ्यांदा प्यायलो,
कि आता पाण्याचीही तहान विसरलो असते कशी..... 

रात्री तुझ्या सोबत जागवल्या,
सोबत तुज्या अंधाराची कसली भीती,
स्वप्नात आता तुला कित्येकदा आपले केले,
तूच सांग मग तू परकी कशी ?

तू भले नाकारशील,
पण तू माझीच आहे,
दैव मानले तुला मी,
आता मला त्या देवाची तरी गरज लागेल कशी ?

Thursday, January 21, 2010

"all is well "

तू नसतानाही,तुझ्यातच रमायला शिकलो आहे,
मी आता "all is well " म्हणत,
स्वतहाच्याच मनाला फसवायला शिकलो आहे...

गर्दीतही स्वताच्याच विचारात हरवलेला असतो,
आणि एक-एकी तिच्या दारी स्वतहाला सापडतो,
रोज चालतो ती वाट आता विसरायला लागलो आहे,
मी आता "all is well " म्हणत,
स्वतहाच्याच मनाला फसवायला शिकलो आहे...

कारण नसता mobile च्या बटनांशी खेळत असतो,
कविता सुचली की sms टाइप करून लगेच delet करत असतो,
कधीतरी चुकून तिच्या mobile वर कविता send करत आहे,
मी आता "all is well " म्हणत,
स्वतहाच्याच मनाला फसवायला शिकलो आहे...

ती समोर आली की मनाची चल-बिचल होते,
आज ती ओळख दाखवेल,की,
नजर चोरून जाइल असे प्रश्न मन विचारते,
म्हणून तर आता खिन्न- शून्य भाव चेहरयावर आणून,
मान सरळ ठेउन चालायला शिकलो आहे,
मी आता "all is well " म्हणत,
स्वतहाच्याच मनाला फसवायला शिकलो आहे...

Sunday, January 10, 2010

पुन्हा ....

पुन्हा सारे तिथे येऊन खोळंबले,
पुन्हा डोळे हलकेच ओथंबले...

ठाव होते मला गुज मनातले तुझ्या,
तुही तर माझे मन जाणत होतीस,
तरी पावलाना तुझ्या का नाही थांबविले...

पहाटेलाही तर अजून अवकाश होती,
झोप तरी कोठे पुरी झाली होती,
स्वप्न ठेवुनी माझी अधुरी,का मला तू जागवले....

तीच वेळ,तोच क्षण,तेच भाव,तेच शब्द,
पुन्हा का तेच तू परतीवले,
पुन्हा सारे तिथे येऊन खोळंबले,
पुन्हा डोळे हलकेच ओथंबले...

Saturday, January 9, 2010

कोणी नाही...

नजर टाकून पाहिली दूरवर  ,
पण दिशा रिकाम्या,दूरवर कोणी नाही...

माळरानही झाले आता सैरभैर ,
वारा झोंबत आहे  ,लक्ख झाला उजेड,
पण पणतीला विजन्याची  जाग नाही.....

आता ना उरले कुंपण,
ना उरले कुंपणाचे अंगण,
घराबाहेर नजर टाकली तर तुळशीला दिवा लावायलाही कोणीच नाही....

सांजही अलीकडे वेड्यागत वागते,
राहून-राहून जुन्या आठवणी मांगते,
पण आत्तातर माझ्याकडे आठवणीही नाही....

वाटा वळण घेतात चुकीच्या,
पण पायांना कोण समजावेल,
जिथे त्याना जायचे आहे तिथे त्यांचे कोणीच नाही....

नजर टाकून पाहिली दूरवर  ,
पण दिशा रिकाम्या,दूरवर कोणी नाही...

Sunday, January 3, 2010

आई खरच बोलायची

आई खरच बोलायची ,
लहानपणी निम्बोनिच्यामागे मामा रहायचा चंद्राच्या दारी,

दिवस तेहि भलेच होते,जेव्हा पाठीवर दप्तराचे ओझे होते,
ते ओझे मनावरच्या ओझ्यापेक्षा हलकेच का नव्हते ?

त्या कमकुवत फांद्या झाडांच्या,ज्या आम्ही लीलया सर करायचो,
आणि आत्ता उंच-उंच इमारती ज्यांची मजले रोज चडूनही स्वतःचेच घर विसरायचो ,

ते शर्ट ज्याचा रंग मैदानाच्या माती समान असायचा,
आणि आता हा अवघडायला लावणारा उच्चभ्रू पेहराव,

त्या रात्री जेव्हा थकून बिछान्यावर आजीच्या गोधडीवर गाढ झोपी जायचो,
आणि आता आईच्या अंगाईच्या आठवणीने रात्रभर रडायचो,

आई खरच बोलायची,
जेव्हा कॉलेजला जाताना ती वाटखर्ची द्यायची,
जपून वापर,नीट रस्ता ओलांड,अभ्यासासोबत मजाही कर....उद्या हे सर्व जवळ नसेलही
आई खरच बोलायची....

तेव्हा कसे वाटते ?

तेव्हा कसे वाटते ?

आयुष्याभर पुरेल असे कोडे जेव्हा कोणी,
नकळतच तुम्हाला देऊन जाते,
खर सांगा तुम्हाला "तेव्हा कसे वाटते?"

स्वतहालाही हरवून बसू अश्या गर्दीत शिरूनही,
पदो-पदी एकच व्यक्ती जेव्हा समोर येते,
खर सांगा तुम्हाला "तेव्हा कसे वाटते?"

माळरानावर रात्रभर एका खडकाला गोंजारूनही,
थंडीच्या पहाटे स्वतः दंवाने ओले होऊनहि,जेव्हा खडकला नाही पाझर फुटते,
खर सांगा तुम्हाला "तेव्हा कसे वाटते?"

कोणी आपले मन संपूर्णपने आपल्या समोर रिकामे करूनही,
त्यात आपण यथकिंचीतही नाही सापडत,
खर सांगा तुम्हाला "तेव्हा कसे वाटते?"

स्वतःपाशी जराही न उरून,
कोणी आपल्याला पाहूनही दुरून,
नजर चुकवते,
खर सांगा तुम्हाला "तेव्हा कसे वाटते?"