कधी कधी तुझी वाट पाहताना,
कधी कधी तुला आठवताना,
कधी तुझे स्वप्ने पहाताना,
तू मला पहावे,एवढ्या साठी कोठे तरी तुझ्या मनात मला लपून रहावेसे वाटते......
स्वर्गाचे कवाड उघडली,जेव्हा तू डोळे उघडली, ओठांवर फुलासम हसणे,डोळे जणू टीम-टीम चांदणे, तू दिसते,वाटते तेव्हा हा क्षण तिथेच थांबावा, गोठलेला तो क्षण असाच डोळ्यात साठवावा, सांग सये कधी संपेल हा....नकोसा वाटणारा दुरावा......
Sunday, February 28, 2010
Wednesday, February 24, 2010
माझी तू -१
हातात हात घेऊन चंद्राचा पाठलाग करू,
चंद्र गाठल्यावर,तेथे एक स्वप्नांचे घर बांधू,
त्यात फक्त तू आणि मी,
आणि नको आणखीन कोणी....
-----------------------------------------------------------------------------------
तुला मी माझ्या डोळ्यात ठेवले जपून,
माघारी तुझ्या मी पहातो डोळे मिटून,
आवाज तुझा सदा कानात रेंगाळत असतो,
जणू देवळात पहाते मंद आवाजात देवाची प्रार्थना होत असते,
तुला जेव्हा हसताना मी पहातो,
वाटते तेव्हा जणू देवच माझे मागणे पुरे करत असतो........

Friday, February 12, 2010
मला परत लहान होता येईल का?
कंबरेच्या करदोऱ्याने हाल्फ चड्डी टाईट करून,
डोक्यावरली टोपी तिरकी करून,
खांद्यावर बॅट घेऊन,
सकाळी खेळताना लागलेली जखम लपवून,
दुपारी परत आईची नजर चुकवून,
परत मैदानात खेळता येईल का?
मला परत लहान होता येईल का?
घड्याळाची काळजी सोडून,
तहान-भूक विसरून,तास्-न-तास् खेळून,
घरी परतताना मित्राशी भांडून,
पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला खिडकीतून हाक मारून,
खेळायला बोलावता येईल का?
मला परत लहान होता येईल का?
गृहपाठ विसरून,वर्गपाठाची वही हरवून,
पहिल्या बाकावरून उठून,
हळूच शेवटच्या बाकावर लपून,
शेजारच्या मित्राला शिक्षा झालेली बघून,
मधल्या सुट्टीत,चिडवता-चिडवता डब्बा खाता येईल का?
मला परत लहान होता येईल का?
शेजारची मुलगी जाताना पाहून,
मित्रांची नजर चुकवून,
तिला हात दाखवून,पण तिने लक्ष दिले नाही म्हणून,
मित्रांच्या गर्दीत तिला परत विसरवता येईल का?
मला परत लहान होता येईल का?
आवडती भाजी नाही म्हणून,
आईने दिलेला डब्बा मुद्दामच घरी विसरून,
दुपारी शाळेच्या गेट बाहेर जाऊन,
ठोसर काकाच्या वडापाव हादडून,
परतताना पेप्सी चोकाता येईल का?
मला परत लहान होता येईल का?
एका दिवसा साठी तरी,
ऑफिसचे कपडे सोडून,
पुन्हा मळलेली पेंट,आणि बटन तुटलेले शहरात घालून,
शाळेत जाता येईल का?
Mr .भंडारे विसरून,मला परत,
मित्रांचा निल्या होता येईल का?

विरह...
प्रत्येकाला नको असणारा विरह,
कोणाचे तरी होऊन,दुरावल्या नंतरचा विरह,
किंवा कोणाचे तरी होता येत नाही म्हणून विरह,
तुझ्या मनात मी नाही म्हणून माझा विरह,
तू कोणाच्यातरी मनात नाहीस म्हणून तुझा विरह,
....
पण माझे तर या विराहावरही प्रेम आहे,
कारण हा विरहाच आपल्यात एक नाते जोडतो,
आणि आपल्याला कोठे तरी एक करतो हा विरह...

माझी तू....
तुझ्या सोबत येणारी प्रत्येक पहाट पाहतो,
सोबत तुझ्याच हर एक रात्र जागवतो...
जश्या तुझ्या सोबत गप्पा रंगतात,
तश्याच तू नसतानाही तुझ्या आठवणी माझ्या सोबत असतात....
तुझे हसणे,तुझे रुसणे,
चेहऱ्यावरले तुझे भाव सारे, माझे डोळे टिपतात,
आणि तुझ्या माघारी तेच माझी खरी साथ देतात...
तास्-न-तास् तुझ्या तसविरीला न्याहाळतो,
तरी डोळ्यात तुझ्या रोज नवा रंग सापडतो...
तशी तू तसविरीतून बाहेरहि येतेस,
मी पाहिलेली स्वप्ने माझ्या सोबत जागवतेस...
कधी हसताना , कधी रडताना,तर कधी मी श्वास घेताना,
तू स्वताहाला माझ्यात हरवतेस,
मी रात्री स्वप्ने पहाताना......
-----------------------------------------------------------------------
माझ्या मनात तुझ्या आठवणींच्या जत्रे भरतात,
तरी आठवणी तुझ्या शिवाय एकट्याच भासतात..
कधी आठवणी सोबत तुही माझ्या मनात ये,
आणि पहा माझ्या रात्री तुझ्या आठवणीन सोबत कश्या जागतात,
तरी आठवणी तुझ्या शिवाय एकट्याच भासतात..
-----------------------------------------------------------------------
जीवनात माझ्या अशी आलीस,
कळलेच नाही कधी जीवनच झालीस...
तुझे हसणे,तुझे रुसणे,
तुझे कधी असणे, अन कधी नसणे,
यांवरच शब्द लिहिले,
आणि कळलेच नाही कधी शब्दांची कविता झाली...

Saturday, February 6, 2010
आठवणीचे गाव.......
तुझ्या आठवणीच्या गावी मन माझे असेच उगी रमते,
हात सरसावतात पुढे,स्पर्षाया तुला,
अन् मन असेच अवचित फसते....
रस्तेहि वाटे ओळखीची,त्यावरली पाउलखुणाही,
आता चालतो एकाकी,मन तुलाच शोधते,
येतेशी समोरी कधी या वाटेवरीही,
साद देतो तुला मी,
अन् मन असेच अवचित फसते....
सांज होता-होता वाराही जोर धरतो,
आडोशा हाताचा करतो,आठवणीचा दिवा मीण-मीणतो,
दिव्याच्या त्या उजेडात, मग विरहाची रात्र मावळते,
अवकाशी चंद्र येतो,

Subscribe to:
Posts (Atom)