Wednesday, September 23, 2009

जगु दे....

हा दिवस थोडा मावळत आहे,
थोडी रात्र उगवू दे,
तुला थोडा विसरतोय,
विसरताना तूला,
थोड़े जगने आठवुदे...

डोळे थोड़े बंद करुदे,
श्वास थोड़े मंदावुदे,
माझ्या डोळ्यात,श्वासात,
तूला जपून ठेवले आहे,
ह्याना आता ज़रा तुझ्या आठवनिंचा विसर पडू दे....

माहीत आहे शक्य नाही,
तरी एकदा मरानोपरी जगने सोडून,
हे जीवना, मला तूला एकदा जगु दे....

Sunday, September 13, 2009

तू ...

मीण -मिणत्या उजेडात,
चंद्र गुण-गुणत होता,
भर दिवसा जणू तो तुला प्रकाश उसने मागत होता....

हसने तुझे बघून,
चांदणही लाजले होते,
एवढे टक लावून त्यानाही कोणी बघितले नव्हते...

हवाही उगाचच,
तुला बिलगून वाहत होती,
तुझ्या केसात हरवून,जणू तिथेच बस्थान मांडू पहात होती...

चिम्ब भिजुन,
पाउसही ओला झालेला,
तुझ्या गंधात सगळे विसरून जणू तो नहालेला...

Thursday, September 10, 2009

परत तूच....

तूज पासून एक वाट हरवली,
तूज वाचून एक रात्र मावळली,
तूज शिवाय एक श्वास विरघळला,
तूज राहून एक अश्रु गोठला,
तूज परी एक अस्तित्व हरपले,
तूच मिळवले,तूच संपविले....
तुजेच होते,तूच दुरावलेस....

Thursday, September 3, 2009

ये ना.....

दिसा मागे दिस सरले,
कळलेच नाही केव्हा तुझी सवय जडले...

जे आहे ते मनी साठवले,
ऊर भरून आल्यावर शब्दातून पाठवले....

तुज शिवाय जगने नाही,
अश्या जगण्या सारखे मरने नाही....

तरी हे मरण हसून स्वीकारले,
मनातील-मनातच पुरून मिळाले...

तुझ्या दारी येउन ऊगी ठेचाळतो,
कळ लागलीच तर स्वताहाच गोंजारतो...

कैफ कैसा हा तुझा चड्ला,मनामधुन उतरेना ?
मन एकाच रट लावतो आता ,बस आता पुरे ये ना, ये ना.....
सखे तू माझी होना....
अर्था पेक्षा माझे शब्दच होते वेडे,
तू एकलेस सर्व,
तरी मनी अजुनही लपवले थोड़े,

सांगेन म्हणतो तुला सर्व काही,
बघ संपत आलाय पाउसकाळ,
डोळेही थकलेत लपवून,
आता आलीये त्यांचीही बरसन्याची वेळ...

लक्ष दे माझ्या बोलान्यापेक्षा,डोळ्यानकड़े,
राहुंदे नको डोळे,
लपत-लपत,
सतत-धार वाहुंदे...

नाही जगने तुझ्याशिवाय,
एवढेच बोलायाचे होते,
तुझ शिवाय मरणार नाही,
जगेन हे मरानोपरी आयुष्य,असेच जगल्याशिवाय....

कोण?

कोण ठाकले हे मनाच्या दारी,
की डोळ्यातून वाहू लागले सरी...


मनाच्या आतही हीच तर ती,
जी मनाच्या बाहेर उभी ठाकली...

मनात झाली एवढी हुर-हुर,
की मनातच मावेना असून ही एवढी दूर-दूर...

जे गुज ठेवले होते मनात जपून,
आज दिसले ते जाता-जाता दुरून...

नजरेनेच कवटाळले तिला,
माफ़ कर दुखले तर...
पण दूर होऊ नये म्हणुन मिठीतच गुरफ़टलो तुला....

थोडी कळ मनातच जेव्हा जाणवली...
तेव्हा डोळे उघडून बघताच,तू नाहीस हे कळले,
आणि मग तेच हात पसरून,
देवाकडे तुला मागितले...