स्वर्गाचे कवाड उघडली,जेव्हा तू डोळे उघडली, ओठांवर फुलासम हसणे,डोळे जणू टीम-टीम चांदणे, तू दिसते,वाटते तेव्हा हा क्षण तिथेच थांबावा, गोठलेला तो क्षण असाच डोळ्यात साठवावा, सांग सये कधी संपेल हा....नकोसा वाटणारा दुरावा......
Thursday, September 3, 2009
कोण?
Wednesday, August 26, 2009
पुन्हा कोण ?
आज या मंद पहाटे,
नभ का धरणीवर कोसळतो?
मनाच्या अंधारलेल्या कोनाड्यात,
कोणत्या आठावणिचा धुंद प्रकाश मिसळवितो ?
जपले होते जे,
मनात विरघळलेले गुज लपविलेले,
डोळ्यात थाम्बविले बंद पापण्यात बांधिलेले,
दिस उगताच का ते हितगुज स्वतहालाच आज सांगितलेले?
अशी का ती हाक होती?
स्वतहालाच,किव्हा कोण्या दुसरयाला होती?
गगनी कोसळून,परत माझ्यातच विरलेली,
या अनंतातही का जागा टोकडिच पडली?
होते नभ ही पाणावलेले,
होते मनही दुरावालेले,
होते आपलेच कोणी उगी रागावलेले...
उसने मन माझेच मज पाशी,कोणत्याच कर्जात जणू पार व्याजावलेले...
स्पर्शात कोण्या आठवणीच्या,
आजही ओलावा जाणवितो,
मनात आहेत...आहेत ना ज्या भावना,
त्याना आपलाच मानवितो....
आज या मंद पहाटे,
नभ का धरणीवर कोसळतो?
मनाच्या अंधारलेल्या कोनाड्यात,
कोणत्या आठावणिचा धुंद प्रकाश मिसळवितो ?
Tuesday, August 25, 2009
पलिकडे...
हे हुंदके तर अगदीच परिचयाचे वाटतात,
कोणाशी तरी बोलत आहे मन,
रात्री चुप-चाप निमूटपणे पडला असतो,
कदाचित माझे मनच असेल,
त्या तिथे पलिकडे हुंदके देणारे ,
Sunday, August 23, 2009
तू नाहीस....
तू नाहीस,
अगदी क्षणापूर्वी पर्यंत होतीस,
पण असे काय झाले?
की तू होतिची नव्हती झालीस....
तू नाहीस,
हे विचारायचे होते तूला की,
तुझ्या शिवाय ह्या जगण्याला काय अर्थ?
पण कळलेच नाही की एवढ्यात तू मला विसरलीस...
तू नाहीस,
सवय झाली होती तुझ्या असण्याची,
कळलेच नाही मला की,
मला तुझ्या असण्याची सवय जडवलिस...
तू नाहीस,
हे मला समजतच नाही,
अता माझे अस्तित्व काय?
या जगण्यात अता तथ्य काय?
तू नाहीस,
पण तू आहेस,
मनात आठवणी म्हणुन,
रात्रीत चांदण बनून, श्वासात सवय बनून,
शब्दात अर्थ बनून....आणि नसन्यातहि....असने बनून,
तू राहिलिस,तू आहेस....
अताशा...
अताशा मी उरलोच नाहीये,
का कोणास ठाउक श्वास तर चालु आहे,
पण जगने-मरने यातील अंतर उरलेच नाहिये...
मी अताशा स्वतःलाच सापडत नाहिये,
मित्रांच्या गर्दित कोंडले तर आहे,
पण कोण जाने कोणती ओळखिची नजर सापडतच नाहिये...
अताशा डोळे सुखतच नाहिये,
भर पावसात उभा ठाकलो तर आहे,
पण आसव पावसात लपतच नाहिये....
अताशा रात्र संपतच नाहिये,
डोळे तर मी घट्ट बंद केले आहे,
पण मरणापरी सकाळ उगवतच नाहिये...
अताशा काहीच कसे आठवत नाहिये?
तसे मनाची सर्व कवाड बंद केलीत मी,
पण एक तुझीच आठवण आहे,
की जी आत खोलवर मनात विसरायची राहून गेलिये....
फ़ोन
आज तुला फ़ोन करावासा वाटत आहे...
का जाणे पण मला तुझा आवाज एकावासा वाटतो...
हातात फ़ोन घेतलाय खरा...
पण काय बोलू तुझ्याशी असा प्रश्न मनात दाटतो.....
तुझ्या-माझ्यात तसे विषयांचे बंधन कधीच नव्हते...
पण नंबर तुझा लावता-लावता सारखा राहतो.....
फ़ोन हातात घेउन कधी पासून फिरतोय,
नेटवर्क तर फुल आहे पण का जाणे का झुरतो....
माहीत आहे वर-वर का नाही,पण तू माझ्याशी बोलशील,
पण बोलली नाहीस तर ह्या विचाराने मन माझा थर-थरातो...
रोज़ म्हणतो आज तरी निदान तू फ़ोन करशील,
वाट बघून थकल्यावर मीच बोलतो चला मीच फ़ोन करतो....
आपण मारलेल्या फ़ोन वरील तासनतास....
गप्पा....आठवून....मग....त्या आठवणी मध्ये रमतो....
पण खरच आज तुला फ़ोन करावासा वाटतो...